मी कविता रणजीत कागले आपल्या संस्थेत २०२३-२४ यावर्षी रुजू झाले. सर्व प्रथम तुम्ही मला माझे मत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आता पर्यंत जिथे जिथे शिकवले तिथे लेसन प्लान (पाठ टाचण ) काढून त्याद्वारे वेगवेगळी उदाहरणे देवून शिकवणे एवढेच माहीत होते. पण शांतीनिकेतन शाळेत आल्यानंतर UBD हा प्रकार पहिला. UBD म्हणजे (Understanding by design) डिझाईन द्वारा समजून घेणे. पाठ शिकवताना त्या पाठाची UBD तयार करणे माझ्यासाठी नवीन होते. UBD बद्दल काहीच माहिती नव्हती. सुरवातीला भीती वाटली माझ्याकडून हे होईल का? अशी शंका वाटली. UBD तयार करताना सुरवातीला काही सुचत नव्हते. पण जसजसे मी ३-४ UBD तयार केल्या आणि त्याप्रमाणे पाठ शिकवला त्यानंतर मला UBD चे महत्व समजले. वेगळ्या पध्दतीने पाठाची तयारी करणे आणि तो मुलांना शिकवणे, वेगळ्या पद्धतीने मुलांना ज्ञान देणे यामुळे शिक्षकांच्या बरोबर मुलांच्याही विचारशक्तीला चालना मिळाली. मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांना व्यवहार ज्ञान देणे त्यांच्यातील कालगुणांना वाव देणे हे UBD च्या माध्यमातून आम्ही मुलांच्याकडून करवून घेऊ शकलो. मी आता UBD तयार करताना माझ्याकडून अधिक परिणामकारक शिक्षण मुलांना कसे दिले जाईल यादृष्टीने विचार करू लागले. UBD मुळे माझ्यातील विविध कालगुणांना सुद्धा चालना मिळाली.
धन्यवाद















